प्रामाणिक पणा हा रक्तात असावा लागतो.

आज मी तब्बल 3 महिन्या मधून रूममध्ये माझे पुस्तकाच कपात आवरत होतो .त्यामध्ये मध्ये सुधा मुर्ती याचं एक पुस्तक हाती लागले .
जे मी गेल्या वर्षी मे महिन्यात वाचले असावे बहुतेक .त्याच नाव वाइज एंड अदरवाइज असे आहे .त्यामध्ये एक गोष्ट आहे .तसेच गोष्ट माझ्या आयुष्यातील आत्ता पर्यंत प्रवासात घडली .तुम्ही म्हणाल जी गोष्ट २०१५ साली झाली .तू पुस्तक वाचले २०१९ मध्ये ..लेखन करतोय २०२० मध्ये ..जरा सविस्तर पणे सांगतो ..त्याच काय झालं .
.मी गेल्या डिसेंबर महिन्यात एका प्रदेश दौरा केला होता आणि येताना  मी एक विलायची देशाची मद्य आणले होते माझ्या काही विशेष जिगरबाज मित्रान साठी  (मी घेत नाही बरं का).मग त्या निमित्ताने
गेल्या रविवारी अभाड्या (अभय जाधव ) च्या रूम वर पार्टी केली .गोष्ट आत्ता सुरू होते .तर सचिन बडागे हा पण आला होता .
   मी आणि सच्या २०१० पासून चे मित्र ..आमच्या मैत्री वर नंतर सविस्तर पणे लिहणार आहे ..पण साधारणपणे २०१२ आमचे कॉलेज संपले .आणि सच्या गावी गेला त्याचा गाव धुळे आहे ..त्याला वाटले की तो धुळे मध्ये जॉब करून शटल होईल पण ते काय झालं नाही .मग तो परत आला २०१४ .
   तो पर्यंत मी जॉब ला लागलो होतो .आणि पुण्यात शटल होण्याच्या प्रयत्न करत होतो.मग परत सच्या माझ्या रूममध्ये राहलाय लागला ..सच्याच जॉब शोधा शोध चालू होते .
दरम्यानच्या काळात बराच वेळ गेला .मग घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आत्ता पुणेमध्ये राहणे मुश्कील झालं .तो मला म्हणाला मी परत धुळे ला जातोय ..परत गावी काही तरी करता येईल .
मग मी म्हटलं आत्ता परत गेला तर तुझा ट्रॅक सुटेल ..मला माहित होत की याची अडचण काय आहे ती.मग मी म्हटलं अजून ६ महिने प्रयत्न कर ..मी देतो तुझा सगळा खर्च ..तू फक्त धीर सोडू नको ..
तयारी चालू राहू दे ..जॉब चे इंटर्व्हिए चालू ठेव .मग् मी त्याला काही प्रमाणात आर्थिक मदत करत गेलो ..आणि माझ्या सवयी प्रमाणे ..जर मी एखाद्या ला मदत केली तर त्याची मी कोठे नोंद ठेवत नाही .
   त्यामुळे मी काही किती पैसे दिले आणि कधी  दिले त्याचा काही विचार नव्हता .काही ठिकाणी मला यांचा त्रास पण झाला आहे पण शेवटी तुम्हाला काही तरी अनुभव मिळत असतो.सच्या मागत गेला आणि मी देत  गेलो
   शेवटी एके दिवशी त्याला जॉब भेटला .साधारण ५ महिने झाले होते ..पण तो याची नोंद ठेवत होता.. मग सच्या जॉब ची पार्टी दणक्यात साजरी केली आम्ही ..मग तो एके दिवशी मला विचारले तुझी किती पैसे आहेत माझ्या कडे मी म्हटलं मी काय हिशोब ठेवला नाही ..तुला किती वाटले तेवढे दे नाही तू हिशेब ठेवला असेल तर तस दे .
   पण त्याला माहिती होतं की मी कोठे मांडून ठेवत नाही ते ..तुम्हाला विश्वास बसत नसेल पण सच्या ने एक एक रुपया चा हिशोब ठेवला होता..मला तो त्याने सांगितलं .आणि आणि माझं एका दिलदार मित्राच्या यादीत आपली जागा अजून पक्की   केली.


मी जेव्हा वाइज एंड अदरवाइज वाचले तेव्हाच ठरवले होती कधी तरी ही गोष्ट सांगेल ..योगायोगाने परवा भेटलो आणि रात्री कपात आवरताना तेच पुस्तक हाती आले ..शेवटी काय आजकाल फार कमी लोका मध्ये प्रामाणिक शिल्लक राहिला आहे ..त्यामध्ये सच्या एक आहे याचा मला आनंद आहे ..👍

Comments

  1. Khupach chhan Vitthal bhau. Ho kharach pramanik pan tar raktatach asate ti kadhi kutun shikals jat nahi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपण कोण ?