आपण कोण ?

परवा एक मे सुट्टीचा दिवस माझ्या सवयी प्रमाणे सहज कोणाला तरी फोन लावायचा आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या फोन झाला आणि मग मी विचारात गेलो.

एक गोष्ट नेहमी सांगितले जाते एक वाघाचे पिल्लू  आपल्या आईजवळ खेळत होते. एके दिवशी ते खेळता खेळता फार लांब गेल्याने ते आपल्या आई पासून फार दूर गेले. आईच्या आठवणीने ते पिल्लू ओरडायला लागले इतक्यात तेथे एक शेळी आले  ते पिल्लू आईसाठी रडताना पाहून  त्या पिल्लालाआपल्याबरोबर घेऊन गेली. आणि त्याचे पालनपोषण करू लागली वाघाचे पिल्लू  वाढू लागले .आणि आणि काही दिवसात शेळी पेक्षाही उंच झाले ,  त्याला पाहून ती शेळी हि घाबरत असे.

एके दिवशी त्या जंगलात एक वाघ आला तो एका खडकावर चढला आणि तेथून त्याने एक मोठी डरकाळी दिली. ती  डरकाळी ऐकून  शेळीही घाबरली .परंतु त्या वाघाच्या पिल्लाला वर वेगळाच परिणाम झाला. त्याच्या मनात निराळाच भावना निर्माण झाल्या जणू त्याच्या नसात वीज वाहत जावी तसा त्याला अनुभव आला आपल्या अंगात काही वेगळेच सामर्थ्य आहे त्याचे त्याला याची जाणीव झाली . आजवर ज्ञान नव्हते उसळी घेऊन बाहेर आले आणि त्या वाघाप्रमाणे डरकाळी  पडून त्याच्या समोर गेले या वाघाच्या पिल्लाला आपण कोण आहोत याची  ज्ञान नव्हते. तो स्वतः शेळीच  पिल्लू समजत होता .त्या शेळी इतकीच ताकद आपल्यात आहे असे तो नेहमी विचार करत होता . यापूर्वी तो कोणी कुत्रा ओरडला तरी घाबरत असे, आता आपलं खरं स्वरूप समजल्यावर तो वाघाप्रमाणे समोर उभे रहायला पण घाबरला नाही आजवर आपण शेळीचे पिल्लु आहोत असाच भ्रम होता.
प्रत्येक माणसात अशी वाघाप्रमाणेच ताकद दडलेली असते पण ते सामर्थ्य सुप्त म्हणजेच झाकलेले असते. पण एखाद्या वेळी असा काही प्रसंग उद्भवतो की त्यामुळे माणसाच्या मनात दडलेली शक्ती जागी होते. माझे अनेक मित्र सध्या युपीएससी-एमपीएससी करत आहेत परंतु काही जणांना माहितीही नाही त्यांच्यात अनेक सुप्त सामर्थ्य दडलेली आहे.

परंतु सध्या ते पण ते सध्या एका सुंदर अशा मृगजळा   मध्ये  फसत चालले आहेत.   मित्रांनो मला माहिती आहे तुमची इच्छाशक्ती काय आहे तुम्ही कोण बोलू शकता .तुमची मेहनत  मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे हा संदेश देण्याचे कारण म्हणजे तुम्ही वाघ आहात  फक्त तुम्ही फक्त शेळीच्या पिल्लाला सारखी  ,अवस्था करून घे नका . मग बाकी माझ्यात सदैव शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सोबत आहेत आणि असतील एवढेच .

Comments

Popular posts from this blog

प्रामाणिक पणा हा रक्तात असावा लागतो.