Posts

Showing posts from May, 2019

आपण कोण ?

परवा एक मे सुट्टीचा दिवस माझ्या सवयी प्रमाणे सहज कोणाला तरी फोन लावायचा आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या फोन झाला आणि मग मी विचारात गेलो. एक गोष्ट नेहमी सांगितले जाते एक वाघाचे पिल्लू  आपल्या आईजवळ खेळत होते. एके दिवशी ते खेळता खेळता फार लांब गेल्याने ते आपल्या आई पासून फार दूर गेले. आईच्या आठवणीने ते पिल्लू ओरडायला लागले इतक्यात तेथे एक शेळी आले  ते पिल्लू आईसाठी रडताना पाहून  त्या पिल्लालाआपल्याबरोबर घेऊन गेली. आणि त्याचे पालनपोषण करू लागली वाघाचे पिल्लू  वाढू लागले .आणि आणि काही दिवसात शेळी पेक्षाही उंच झाले ,  त्याला पाहून ती शेळी हि घाबरत असे. एके दिवशी त्या जंगलात एक वाघ आला तो एका खडकावर चढला आणि तेथून त्याने एक मोठी डरकाळी दिली. ती  डरकाळी ऐकून  शेळीही घाबरली .परंतु त्या वाघाच्या पिल्लाला वर वेगळाच परिणाम झाला. त्याच्या मनात निराळाच भावना निर्माण झाल्या जणू त्याच्या नसात वीज वाहत जावी तसा त्याला अनुभव आला आपल्या अंगात काही वेगळेच सामर्थ्य आहे त्याचे त्याला याची जाणीव झाली . आजवर ज्ञान नव्हते उसळी घेऊन बाहेर आले आणि त्या वाघाप्रमाणे डरकाळी  पडून त्याच्या समोर गेले या वा